Union Budget 2026 Updates

Budget 2021 : सोने-चांदीतील शुल्ककपात फायद्याची! 

अमित मोडक(कमॉडिटी तज्ज्ञ)

सोने-चांदीवरील शुल्क १२.५० टक्क्यांवरून ७.५० टक्के केले आहे. पण, या व्यतिरिक्त २.५ टक्के कृषी अधिभार (सेस) लावण्यात आला आहे व पूर्वीपासून असणारा ०.७५ टक्के सेस कायम आहे. त्यामुळे आता सोने-चांदीवरील एकूण शुल्क १०.७५ टक्के झाले आहे. तसेच, आयात शुल्कात आगामी काळात आणखी सुसूत्रता वा कपात होण्याचे सूतोवाच केले आहेत. 

बजेटच्या घोषणांमुळे काय स्वस्त, काय महाग? वाचा सविस्तर

केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी होईल, अशी बरेच जणांना अपेक्षा होती. कारण सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ३०-३२ हजार रुपयांपासून वाढून सुमारे ५२ हजार रुपयांच्या पातळीवर गेले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंसाला १३०० डॉलरपासून २००० डॉलरपर्यंत गेले होते. त्यामुळे सरकारला सोन्याच्या प्रति १० ग्रॅममागे मिळणारे शुल्कदेखील वाढले होते. आता सोने-चांदीवरील शुल्क १२.५० टक्क्यांवरून ७.५० टक्के केले आहे. पण, या व्यतिरिक्त २.५ टक्के कृषी अधिभार (सेस) लावण्यात आला आहे व पूर्वीपासून असणारा ०.७५ टक्के सेस कायम आहे. त्यामुळे आता सोने-चांदीवरील एकूण शुल्क १०.७५ टक्के झाले आहे. तसेच, आयात शुल्कात आगामी काळात आणखी सुसूत्रता वा कपात होण्याचे सूतोवाच केले आहेत. सोन्याच्या भावात आयात शुल्क समाविष्ट असते. अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील शुल्ककपातीमुळे सोन्याचा भाव २ ते २.५० टक्के घसरला. त्यामुळे आपल्याकडेही सोन्यात घसरण झालेली दिसली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी वाढत असल्याने चांदीच्या भावावर शुल्ककपातीचा परिणाम दिसला नाही. मात्र, शुल्क तेच राहिले असते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव चढा राहिला असता, तर चांदीचा भाव प्रति किलो ७६ हजार रुपयांवर गेला असता. पण, आयात शुल्क कमी झाल्याने चांदीच्या भाव जिथे आहे तिथेच कायम राहिला. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वाढतच गेला किंवा डॉलरच्या तुलनेत रुपया कमकूवत होत राहिल्यास सोने-चांदीचा भाव वाढू शकतो. मात्र, आयात शुल्क कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांना नक्कीच होईल. 

ठळक वैशिठ्ये 
- सोने-चांदीवरील शुल्क १२.५० टक्क्यांवरून ७.५० टक्के 
- आयात शुल्कात आणखी सुसूत्रता वा कपात होण्याचे सूतोवाच 
- आयात शुल्क कमी झाल्याने चांदीच्या भाव कायम 
- आयात शुल्क कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांना 

गुण  : १० पैकी ७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT